🔹कुपोषणाच्या विरोधात UNWFP च्या 'फीड अवर फ्यूचर' मोहीमेचा प्रारंभ🔹
▪️ठळक बाबी
– या मोहिमेच्या प्रारंभामध्ये टीव्ही होस्ट मिनी माथुर यांच्याकडून संचालित सिनेमा आणि सामाजिक परिवर्तनाबद्दल चर्चासत्र आयोजित केले जाणार.
– शून्य उपासमारीचे जग तयार करण्याच्या उद्देशाने UFO मूव्हीज संस्थेच्या पाठिंब्याने हे अभियान चालवले जाणार आहे.
– WFPचे ‘शेयर द मील’ हे जागतिक उपासमारी विरोधातले जगातले पहिले मोबाइल अॅप जाहीर करण्यात आले आहे.
– अॅप वापरकर्त्यांना लहान देणग्या देता येणार आणि त्यातल्या प्रगतीचा मागोवा घेण्यास सक्षम करते.
▪️पार्श्वभूमी
– 2018 साली फेसबुक, ग्लोबल सिनेमा अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (SAWA) आणि WFP यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
– सर जॉन हेगर्टी ह्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी चित्रपटाची शक्ती वापरण्याची संकल्पना मांडली होती.
– जाहिरातीच्या माध्यमातून डिजिटल सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर देणग्या देण्यासाठी देणगीदारांना प्रवृत्त करणे हा त्या संकल्पनेचा हेतू होता.
▪️UNWFP बाबत
संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रम (UNWFP) ही अन्न-पुरवठा संदर्भात सहाय्य करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) एक शाखा असून ती जगातली सर्वात मोठी मानवतावादी संघटना आहे जी उपासमारी व अन्न सुरक्षा अश्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देते. संस्थेची स्थापना 19 डिसेंबर 1961 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय रोम (इटली) येथे आहे.
संस्था दरवर्षी 83 देशांमधल्या सरासरी 91.4 दशलक्ष लोकांना अन्न पुरवठा करून मदत करते. ही संस्था अशा लोकांना मदत करते जे स्वत: आणि त्यांच्या कुटुंबासाठी पुरेसे अन्न मिळवू शकत नाहीत. ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाची (UNDG) सदस्य आणि त्याच्या कार्यकारी समितीचा एक भाग आहे.

No comments:
Post a Comment