Sunday, October 27, 2019

व्यवसाय सुलभीकरणात भारत 63 स्थानावर आहे: जागतिक बँक

- जागतिक बँकेनी व्यवसाय सुलभीकरणाबाबतचा ‘इज ऑफ डूइंग बिझनेस 2020’fc या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात 190 देशांची तुलना करण्यात आली आहे.

- या अहवालात दिलेल्या व्यवसाय सुलभीकरणाबाबत जागतिक मानांकन यादीत भारताने 63वे स्थान पटकावले आहे, जे गेल्या वर्षी 77 व्या स्थानावर होते.

▪️भारताची कामगिरी

 - अहवालातल्या 10 पैकी सात वर्गांमध्ये भारताची कामगिरी सुधारली असून ती सर्वोत्तम देशांच्या जवळ पोहोचली आहे. दिवाळखोरीचा निपटारा, बांधकाम परवाने, मालमत्ता नोंदणीकरण, सीमेपलिकडील व्यापार आणि कर भुगतान या क्षेत्रांमध्ये भरघोस सुधारणा दिसून आली आहे.

- 2015 सालापासून भारत व्यवसाय सुलभीकरणात सातत्याने भरीव कामगिरी करत असून सलग तिसऱ्या वर्षी यात प्रगती दिसून आली आहे. सलग तिसऱ्या वर्षी भारत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 10 देशांमध्ये समाविष्ट झाला आहे. गेल्या पाच वर्षात भारताने 79 स्थानांची प्रगती केली आहे.

- दिवाळखोरीतून देण्यांची वसूली होण्याचे प्रमाण 26.5 टक्क्यांवरून 71.6 टक्क्यांवर आले आहे.

- दिवाळखोरी अंमलात आणण्याचा कालावधी 4.3 वर्षांवरून 1.6 वर्षांवर आला आहे.

- बांधकाम परवाने देण्याच्या प्रक्रियेतील टप्पे कमी केले गेलेत.

- दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताचे शीर्षस्थान कायम आहे. पूर्वी 2014 साली भारत सहाव्या स्थानी होता.

▪️जागतिक कामगिरी

- व्यवसाय सुलभीकरणाच्या संदर्भातल्या मानांकन यादीत सर्वाधिक गुण मिळविणारा न्युझीलँड हा देश ठरला.

- त्याच्यापाठोपाठ दहा अर्थव्यवस्थांमध्ये सिंगापूर, हाँगकाँग, डेन्मार्क, कोरिया प्रजासत्ताक, अमेरिका, जॉर्जिया, ब्रिटन, नॉर्वे आणि स्वीडन आहेत.

- सर्वोत्तम कामगिरी दर्शविणार्‍या देशांमध्ये सामान्यत: ऑनलाइन व्यवसायाची अंतर्भूत प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कर द्यावयाचे मंच आणि मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी ऑनलाइन प्रक्रिया होते.

- सौदी अरब, जॉर्डन, टोगो, बहरीन, ताजिकिस्तान, पाकिस्तान, कुवैत, चीन, भारत आणि नायजेरिया या दहा अर्थव्यवस्थांमध्ये व्यवसायासाठी वातावरण तयार करण्यात सर्वाधिक सुधारणा झाली.

- दहा सर्वात सुधारित देशांपैकी चार मध्य-पूर्व, उत्तर आफ्रिका मधले देश आहेत.

- बहरीनने सर्वाधिक सुधारणांची अंमलबजावणी केली आणि अहवालात मोजल्या गेलेल्या दहा पैकी नऊ क्षेत्रांमध्ये सुधारणा केली. त्यापाठोपाठ चीन आणि सौदी अरबने प्रत्येकी आठ सुधारणा घडवून आणल्या.

- दक्षिण आशियाई प्रदेशातल्या बर्‍याच अर्थव्यवस्थांनी व्यवसाय नियमनाच्या संदर्भात सुधारणेचा वेग कायम ठेवला आहे, कारण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी जगातल्या प्रथम दहा सर्वात सुधारित अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आणि त्यांच्या व्यवसाय सुलभतेत सुधारणा घडविली. पाकिस्तानमध्ये विद्युत जोडणी मिळविण्यासाठी लागणारा वेळ 49 दिवसांनी कमी करण्यात आला.

- जगभरातल्या 115 अर्थव्यवस्थांच्या सरकारने त्यांच्या स्थानिक खासगी क्षेत्र, अधिक नोकर्‍या मिळवण्याचा मार्ग प्रशस्त करणे, विस्तारीत व्यवसायिक क्रियाकलाप आणि बर्‍याच लोकांना उच्च उत्पन्न देणे अश्या बाबींच्या संदर्भात व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी गेल्या वर्षभरात एकूण 294 सुधारणा घडवून आणल्या.

No comments:

Post a Comment

 भारतीय डाक महाराष्ट्र मध्ये ग्रामीण डाकसेवक पदाच्या  १२८२८ पदाकरिता भरती  Indian Post Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2023 ...

Popular Posts